नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तु आणि सेवा कराच्या दरात बदल करायचे किंवा नाहीत याबाबतचा विचार, वर्षातून एकदाच केला जाऊ  शकतो, असा विचार प्रत्येक बैठकीत केला जाऊ शकत नाही असं वस्तु आणि सेवाकर मंत्रीगटाचे समन्वयक आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी म्हटलं आहे.

ते नवी दिल्ली इथं फिक्कीनं आयोजित केलेल्या परिषदेच्या एका सत्रात बोलत होतं. महसुल वसुली प्रक्रियेत स्थिरता येईपर्यंत वस्तु आणि सेवाकाराच्या दरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्र किंवा कोणतंही राज्य सरकार कराचे दर वाढवू इच्छित नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.