नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उष्णतेच्या वाढत्या लाटेमुळे ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी वणवा लागला आहे, सिडनीलगतचे क्षेत्र आगीच्या ज्वाळांनी वेढल्यानं तिथे आपत्कालीनसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनारपट्टी  पश्चिमेकडून आलेल्या उष्णतेच्या लाटेचा सर्वात मोठा फटका बसला आहे. ४० हजार हेक्टरहून मोठ्या क्षेत्रांत पसरलेली आग विझवण्यासाठी पंधराशेहून अधिक अग्निशमन जवान प्रयत्नांची शर्थ करत आहे.