नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यातून यावर्षी नऊ महिन्यांच्या कालावधीत ३ हजारांव्या डब्याचं उत्पादन झालं आहे. रेल्वे डब्यांची वाढती मागणी पूरी करण्याच्या दृष्टीनं या डब्यांचा उपयोग होईल.
गेल्या वर्षी इतक्या डब्यांच उत्पादन करण्यासाठी २८९ दिवस लागले होते. यंदा २१५ दिवसातच ३ हजार डब्यांचं उत्पादन झालं आहे. २०१४ पर्यंत या काळात १ हजार डब्यांचं उत्पादन होत होतं.