नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचं चार दिवसांच्या दौर्‍यासाठी आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याला पोचले. ते उद्या उत्तर गोदावरी जिल्ह्यातल्या तडेपल्लीगुडम इथं होणार्‍या एनआयटीच्या पहिल्या पदवीप्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

पंचवीस तारखेला विजयवाडाच्या जवळ असलेल्या अतकुरु इथल्या स्वर्ण भारत ट्रस्टच्या वैद्यकीय शिबिराचं उद्धाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय 26 डिसेंबरला राजमहेन्द्रेवरम इथं होणार्‍या काही कार्यक्रमांमधेही ते सहभागी होतील.