नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चाबहार इथल्या शाहीद बेहेश्ती बंदर सुरु करण्याबाबतच्या प्रगतीबद्दल भारत आणि इराणनं समाधान व्यक्त केलं आहे.
या बंदरामुळे भारत आणि इराण, अफगाणिस्तान, मध्य आशिया, तसंच युरोपादरम्यान व्यापार संबंध आणि संपर्क व्यवस्था बळकट होईल, असं मत परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर अणि इराणचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर महम्मद जवाद जरीफ यांनी व्यक्त केला आहे.
इराणची राजधानी तेहरान इथं काल जयशंकर आणि जरीफ यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली भारत-इराण संयुक्त आयोगाची 19 वी बैठक झाली