नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांग्लादेशाचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्या प्रकरणातला दोषी आणि माजी लष्करी अधिकारी अब्दुल माजीद याला काल रात्री मध्यरात्रीनंतर ढाका इथं फाशी देण्यात आली. शेख मुजीबूर रेहमान यांच्या हत्येनंतर फरार असलेल्या माजीद याला ७ एप्रिलला अटक झाली होती.
राष्ट्रपती एम. अब्दुल हमीद यांनी तीनच दिवसांपूर्वी माजीद यानं केलेला दयेचा अर्ज फेटाळून लावला होता. शेख मुजीबूर रेहमान यांची १९७५ ला हत्या झाली होती. या हत्याकांडात १२ माजी लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश होता. या दोषींना १९९८ साली फाशी सुनावल्यानंतर, २००९मध्ये बांग्लादेशाच्या सर्वोच्च न्यायालयानं या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं होतं.