नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षणसंस्थेतील सर्व घटकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवणं, तसंच, विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाचं शैक्षणिक वातावरण कायम ठेवायच आपलं प्राथमिक उद्दिष्ट आहे, असं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल “निशंक” यांनी व्यक्त केलं.

नवी दिल्ली इथं ‘युक्ती’ म्हणजेच, यंग इंडिया कॉम्बेटिंग कोविड विथ ज्ञान, तंत्रज्ञान, नवीनीकरण या संकेत स्थळाच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. झाले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाने कोविड19 च्या पार्श्वभूमीवर हाती घेतलेले उपक्रम आणि उपाययोजना यांची नोंद ठेवणे तसेच त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी हे संकेत स्थळ विकसित केलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.