मुंबई (वृत्तसंस्था) : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या ५० हजार बेरोजगार तरुणांना उद्योग, व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं उद्दिष्ट असून, आतापर्यंत राज्यात ११ हजार तरुणांनी महामंडळाच्या माध्यमातून 550 कोटी रुपयांचं  कर्ज घेवून व्यवसाय सुरू केले आहेत.

महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जालना इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात यापुढे जिल्हा आणि तालुका पातळीवर प्रशिक्षण शिबिरं, जनजागृती मेळाव्यांच्या माध्यमातून अधिकाधिक मराठा तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ प्रयत्न करेल, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, बँकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून महामंडळाची अधिकाधिक कर्ज प्रकरणं  मंजूर  करावीत, असे निर्देश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत बँक अधिकाऱ्यांना दिले.