नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लखनौ-दिल्ली दरम्यान यशस्वीपणे धावत असलेली उच्चश्रेणी तेजस रेल्वेची सेवा आता मुंबई-अहमदाबाद दरम्यान उपलब्ध होणार आहे.
या सेवेचं उद्धाटन १७ जानेवारी रोजी अहमदाबाद इथून होणार आहे, तर व्यावसायिक तत्त्वावर ही गाडी १९ जानेवारी पासून सुरु होणार असून, या गाडीचं आरक्षण www.irctc.co.in या संकेतस्थळावर तसंच आय.आर.सी.टी.सी रेल कनेक्ट या मोबाईल अँँपवर उपलब्ध आहे. मात्र रेल्वेच्या तिकीट खिडकीवर ही तिकीटं उपलब्ध नाहीत.