नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानार्जन हे केवळ मातृभाषेतून होत असतं, त्यामुळे शाळांमधे इंग्रजीचा माध्यम म्हणून सर्रास होणारा वापर चिंताजनक असल्याचं, ज्येष्ठ साहित्यीक भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे.

नेमाडे आणि हिंदी साहित्यीक ग्यानराजन यांना मुंबईत गीतकार गुलजार यांच्या हस्ते अक्षदीप सन्मान देऊन, गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. आदिवासी मुलांच्या शाळांमधे देखील इंग्रजीचा वापर वाढल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.