नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आखाती देशांमधे राजकीय स्थिती अस्थिर आणि नाजूक असल्यानं तिथं जपानी जहाजांच्या रक्षणासाठी एक लढाऊ जहाज आणि गस्ती विमानं पाठवण्याचा निर्णय जपान सरकारनं घेतला आहे.
जपान अशा प्रकरची पथकं क्वचित पाठवतो. गेल्या काही दिवसात या भागात जपान हाताळत असलेल्या तेल टँकरवर हल्ले झाले. या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याचं जपान सरकारच्या प्रसिद्धी कार्यालयानं म्हटलं आहे.