नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं उद्धाटन काल परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं. या महोत्सवासाठी भारतानं तीन चित्रपट आणि एका माहितीपटाची निवड केली आहे. बर्लिन चित्रपट महोत्सवाचं हे ७० वं वर्ष असून, यावेळी त्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्यातून सहभागी होत आहे.

त्याआधी डॉक्टर जयशंकर यांनी जर्मनीचे परराष्ट्रमंत्री हीको मास यांच्याशी चर्चा केली. भारत आणि युरोपीय संघात सहकार्य वाढवण्यासाठी दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी मास यांचे आभार मानले.

भारताची जगाशी भागिदारी आणि निर्मिती सहकार्य मजबूत करण्याची क्षमता चित्रपट माध्यमात आहे, असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. ते काल बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या भारतीय पॅवेलियनचं उद्धाटन करताना बोलत होते.

सहनिर्मिती करार, चित्रपट सुविधा कार्यालय आणि इफ्फी हा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, या गोष्टी भारत हा चित्रपट क्षेत्रातली उभरती बाजारपेठ असल्याचं सिद्ध करतात, असं ते म्हणाले. चित्रपट निर्मितीच्या विविध अंगांमधे गुणवत्तेला संधी उपलब्ध केली आहे, असं त्यांनी सांगितलं.

या महोत्सवासाठी भारतानं तीन चित्रपट आणि एका माहितीपटाची निवड केली आहे. बर्लिन चित्रपट महोत्सवाचं हे ७० वं वर्ष असून, यावेळी त्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्यातून सहभागी होत आहे.