नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅम इथं २०२२ मध्ये  होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी हा क्रीडाप्रकार वगळल्यामुळे या स्पर्धेत सहभागी न होण्याचा आधी घेतलेला  निर्णय  भारतानं मागे घेतला आहे. तसंच २०२६ किंवा २०३० साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेआधी नेमबाजी स्पर्धेचं यजमानपद घेण्याचा देखील भारत विचार करत आहे,असं भारताच्या ऑलम्पिक समितीनं जाहीर केलं आहे.

नवी दिल्ली इथं झालेल्या समितीच्या बठकीत हा निर्णय घेतला गेला. या संदर्भात एक प्रस्ताव राष्ष्ट्रकुल स्पर्धेच्या संघटनेला दिला जाणार आहे. राष्ष्ट्रकुल स्पर्धा संघटनेचे अध्यक्ष डेम लुईस मार्टिन, यांनी भारताच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या आधी २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद भारतानं भूषवलं होत.