नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईस्ट लंडन इथं झालेल्या तिस-या एकदिवसीय युवा क्रिकेट सामन्यात 19 वर्षांखालच्या भारतीय संघाचा पराभव,ईस्ट लंडन इथं झालेल्या तिस-या एकदिवसीय युवा क्रिकेट सामन्यात 19 वर्षांखालच्या भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला.
यजमान दक्षिण आफ्रिकेनं पाच गडी राखून हा सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 8 बाद 192 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनं 10 चेंडू बाकी असतानाच ही धावसंख्या पार केली. तीन सामन्यांच्या या मालिकेत आधीचे दोन्ही सामने जिंकले असल्यानं भारतानं ही मालिका जिंकली आहे.