नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या २५ राज्यांमध्ये १०० टक्के विद्युतीकरण झालं आहे अशी माहिती केंद्र सरकारच्या उर्जा विभागानं दिली आहे. आता केवळ आसाम, राज्यस्थान, मेघालय आणि छत्तीसगढमधल्या १० लाख घरांना विद्युत जोडणी देण्याचं काम शिल्लक आहे असं उर्जामंत्री आर. के. सिंग यानी म्हटलं आहे.

लवकरात लवकर १०० टक्के विद्युतीकरणाचं उद्दिष्ट पूर्ण करता यावं यासाठी ही चारही राज्यं प्रयत्न करत आहेत असंही सिंग यांनी म्हटलं आहे. शंभर टक्के विद्युतीकरणाचं ध्येय यावर्षीच्या ३१ मार्चपर्यंत पूर्ण करता यावं यासाठी मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात प्रदानमंत्री सौभाग्य योजना सुरु केली होती अशी माहिती सिंग यांनी दिली.