नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय वैद्यकीय परिषद सुधारणा विधेयक काल लोकसभेत मंजूर झालं. यानुसार देशातल्या वैद्यकीय शिक्षण व्यवस्थेची फेररचना केली असून भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद  तीन ऐवजी एक वर्षासाठी कार्यरत राहिल.

अंतरीम अवधीत केंन्द्र सरकारने नेमलेल्या संचालन मंडळाकडे परिषदेचे अधिकार असतील. आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी या विधेयकावरच्या चर्चेत बोलताना या विधेयकानुसार संचालन मंडळाच्या सदस्यपदी सक्षम प्रशासकांची नियुक्ती केली जाईल यांची ग्वाही दिली.