नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॉर्दर्न कमांडचे जीओसी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी कृष्णा घाटी सेक्टरमधल्या लष्कराचे तळ आणि चौक्यांना भेट दिली आणि तिथल्या सज्जतेची पाहणी करून तिथं तैनात जवानांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत व्हाईट नाईट कॉर्प्स् चे कमांडर लेफ्टनंट जनरल हर्ष गुप्ता होते. या ठिकाणी असलेल्या उच्च तंत्रज्ञानयुक्त सामग्रीची आणि तिथं घुसखोरी रोखण्यासाठी केलेल्या नावीन्यपूर्ण उपाययोजनांची त्यांनी माहिती घेतली.