नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत डिसेंबर २०१९ ते मार्च २०२० या काळातला दोन हजार रुपयांचा तिसरा हप्ता प्रधानमंत्र्यांनी जारी केला. सुमारे सहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेट जमा झाला.

कर्नाटकात तुमकूर इथं झालेल्या एका कार्यक्रमात प्रधामंत्र्यांनी हा निधी जारी केल्याचं जाहीर केलं आहे. आठ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधामंत्र्यांनी प्रमाणपत्रं प्रदान केली.

या योजनेअंतर्गत छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी दरवर्षी सहा हजार रुपये मदत तीन टप्प्यात दिली जाते.