नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘ट्राय’ अर्थात, भारतीय दूरसंचार नियंत्रण प्राधिकरणानं केबल आणि इतर प्रसारण सेवांवरच्या नियमनासंदर्भात ग्राहकांचं हित लक्षात घेऊन काही सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे केबल टीव्हीचे ग्राहक कमी दरात जास्त वाहिन्या पाहू शकणार आहेत.
आता ग्राहकाला सर्व विनाशुल्क वाहिन्या केवळ १६० रुपयात पाहता येतील. एका घरात एकाहून अधिक टीव्ही संच असतील, तर नेटवर्क क्षमता शुल्कापोटी जास्त रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असंही ‘ट्राय’ च्या निवेदनात म्हटलं आहे.