मुंबई : विधिमंडळ सदस्यांसाठी असलेल्या मनोरा आमदार निवासाचे काम पूर्ण होईपर्यंत आमदारांची तात्पुरती निवास व्यवस्था व्हावी यासाठी घाटकोपर येथील प्रस्तावित आमदार निवासाची विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पाहणी केली.

यावेळी विधिमंडळाचे सचिवस्तरीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.