नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाखच्या लेह परिसरात येत्या दोन दिवसात हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या बर्फाळ प्रदेशाच्या पर्यावरणाचा अभ्यास करणा-या प्रयोगशाळेनं हा इशारा जारी केला आहे.
लेह जिल्हा प्रशासनानं नजिकच्या डोंगराळ भागात बर्फाचे कडे कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.