नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेकडून आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात मायगव्ह अँपवर सूचना मागवल्या आहेत. १३० कोटी भारतीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेलं हा अर्थसंकल्प असून, भारताच्या विकासाकडे अग्रेसर होणारं पाऊल आहे, म्हणून जनतेचा सहभाग आवश्यक आहे, असं त्यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे.

याआधी शिक्षण, कृषी आणि अन्य क्षेत्रात अर्थमंत्रालयानं अशास पद्धतीच्या सूचना मागवल्या होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी विविध क्षेत्रातल्या तज्ञांशी याबाबत चर्चा केली आहे.