नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणरत्ने यांच्या नेत्तृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्ठ मंडळ आज संध्याकाळ पासून दोन दिवसाच्या भारत भेटीवर येत आहे.
परराष्ट्रीय व्यवहारमंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांच्या बरोबर त्यांची शिष्टमंडळ स्तरीय बैठक होणार आहे. आर्थिक प्रकल्पांमध्ये सहकार, मच्छीमारांचा प्रश्न, हिंद महासागरात स्थिरता, आदी विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.