नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे. याचा आज देशातल्या बँक सेवांवा परिणाम झाला आहे.
बँकांचं विलीनीकरण, खाजगीकरण, फी-वाढ आणि वेतनमान संबंधित सरकारी धोरणांना बँक कर्मचा-यांचा विरोध आहे. तो या संपातून दर्शवला जातो आहे, असं संघटनेचे सरचिटणीस सी एच वेंगटाचलम यांनी म्हटलं आहे. मुंबईतही आज बँक कर्मचारी संघटनेनं निदर्शनं करुन संपाला पाठिंबा दिला.