नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राचं उद्धाटन केलं तसंच राष्ट्रीय गुन्हे सूचना पोर्टलचं लोकार्पण केलं. ऑक्टोबर-२०१८ मधे मंजुरी देण्यात आलेल्या या अद्ययावत केंद्राचा उद्देश सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्याचा व्यापक आणि समन्वित पद्धतीनं सामना करणं हा उद्देश आहे.

गृहमंत्रालयाच्या निर्णयानुसार १५ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रादेशिक सायबर गुन्हे समन्वय केंद्र स्थापन करायला सहमती दर्शवली आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे सूचना पोर्टल नागरिक केंद्री उपक्रम असून यामुळे नागरिकांना पोर्टलच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांशी संबंधित तक्रीर ऑनलाईन नोंदवता येतील. राज्य अणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या संबंधित कायदा अंमलबजावणी संस्था या तक्रारींवर कारवाई करतील.