नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्पादन क्षेत्रातल्या वाढीमुळे गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात औद्योगिक उत्पादनात १ पूर्णांक ८ दशांश टक्के वाढ झाली. तीन महिन्याच्या घसरणीनंतर ही वाढ नोंदवण्यात आल्याचं, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत नमूद करण्यात आलं आहे.

नोव्हेंबर -२०१९ मधे उत्पादन क्षेत्रातील वाढीचा दर २ पूर्णांक ७ दशांश टक्के राहीला, याच महिन्यात वीजनिर्मिती आणि खाण क्षेत्रातल्या उत्पादनात मात्र घट झाली. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत औद्योगिक उत्पादन वाढीचा दर शून्य पूर्णांक ६ दशांश टक्के राहिला. एप्रिल ते नोव्हेंबर-२०१८ मधे हा दर ५ पूर्णांक ६ दशांश टक्के होता.