नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुवाहाटी इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत आज विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. यात प्रामुख्यानं जिम्नॅस्टीक, सायकलींग, मैदानी स्पर्धा, टेबल टेनिस आणि ज्युडो यांचा समावेश आहे.

सध्या पदतालिकेत सात सुवर्ण, आठ रौप्य पदकांसह महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. सहा सुवर्ण पदकांसह उत्तर प्रदेश दुस-या, पाच सुवर्ण आणि एक रौप्य पदकांसह दिल्ली तिस-या स्थानावर आहे.