नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गोव्यातल्या महिला उद्योजकांसाठी केंद्रीय महिला, बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी काल ‘यशस्विनी’ योजनेची सुरुवात केली. पणजीजवळ तालीगावातल्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम इथं झालेल्या एका कार्यक्रमात या योजनेला सुरुवात झाली.
स्वास्थ्य सखी प्रकल्प आणि स्तनांच्या कर्करोगावर उपचारांसाठी सुरुवात करण्याच्या उद्देशानं एका योजनेचं उद्धाटनही यावेळी झालं. ‘यशस्विनी’ योजनेअंतर्गत महिला स्वसहाय्यता गटांना उद्योगासाठी पाच लाख रुपयांपर्यंत व्याजमुक्त कर्ज दिलं जाणार आहे.