नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली विधानसभेच्या आगामी निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावं म्हणून दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी लोकांच्या सहभागासाठी कालपासून मतदान अभियान सुरु केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत  विधानसभेच्या ३० जागांवर सर्वात कमी मतदान झाल्यामुळे या जागांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. पथनाट्य आदींच्या माध्यमातून हे अभियान चालवलं जाणार आहे.