नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात नागपूर इथं दुस-या सीएनजी स्थानकाचं उद्धाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं. वाडी इथल्या रॉमॅट इंडस्ट्रीजनं स्थापन केलेलं हे सीएजी स्थानक नागपूर महापालिकेच्या सर्व बसना सीएनजी पुरवठा करेल, तसंच डिझेल बस सीएनजी बसमधे रुपांतरित करणार आहे.
यामुळे या बसचं आयुर्मान १५ वर्षांनी वाढेल, अशी माहिती गडकरी यांनी दिली. कृषी तसंच जैविक कच-यापासून जैविक सीएनजीची निर्मिती करण्यावर भर द्यावा, असं गडकरी यावेळी म्हणाले.