नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय हवाई दलाला शस्त्रसज्ज करण्यासाठी सरकार सुमारे २०० लढाऊ विमानं खरेदी करण्याच्या तयारीत आहे, असं संरक्षण सचिव अजय कुमार यांनी म्हटलं आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाचं लोकार्पण काल कोलकाता इथं करताना ते पत्रकारांशी बोलत होते.

हिंदूस्थान एरॉनॉटीकल लिमिटेड निर्मित तेजस मार्क वन या हलक्या लढाऊ विमानांच्या ८३ विमानांसाठीचा करार अंतिम टप्प्यात असून, याशिवाय आणखी ११० विमानांच्या खरेदीसाठी प्रक्रिया सुरु झाली आहे, असंही ते म्हणाले.

कारगिल युद्धात महत्त्वाची कामगिरी बजावणा-या मिग-२७ या लढाऊ विमानाची शेवटची तुकडी २७ डिसेंबर रोजी निवृत्त झाली आहे. या पार्श्वभूमीवर हवाई दलासाठी सुमारे २०० विमानांची ही खरेदी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.