नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्वसामान्य नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचं मत केंद्रिय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते नवी दिल्लीत आयोजित रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते.

देशातल्या रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत गेल्या पाच वर्षात चार टक्क्यांनी वाढ झाल्याच्या अहवालाबाबतही त्यांनी दुःख व्यक्त केलं. या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी एकत्र येऊन हे अपघात कमी करण्याचे प्रयत्न करायला हवेत, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं.