नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमानच्या राजेपदी निवड झाल्याबद्दल सुलतान सय्यद हैथम बिन तारीक अल सैद यांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. नवीन सुलतानांच्या नेतृत्वाखाली ओमान आपली प्रगतीची वाटचाल आणि वैश्विक शांतीसाठीचं, योगदान कायम राखेल असा विश्वास त्यांनी ट्विटरवर व्यक्त केला.
भारताचे ओमानशी ऐतिहासिक संबंध असून, दोन्ही देशांतले परस्पर संबंध अधिक वाढवण्यासाठी भारत सय्यद हैथम यांच्या सोबत जोमाने काम करेल, असंही प्रधानमंत्री म्हणाले.