नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेजारील देशांमध्ये आपल्या हिताचं संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जयशंकर यांनी वर्तमानातील घडामोडींबाबत, शेजारील देशांबाबतचे आपले विचार मांडले तसेच विविध मुद्द्यांर चर्चा केल्याचं एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे. समितीचे सदस्य आणि बीजू जनता दलाचे खासदार संबित पात्रा यांनीही विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली.

एकमेकांमध्ये समन्वय असणं अत्यंत महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. भाजपा खासदार जी.वी.एल.नरसिंह राव यांनी डॉ.जयशंकर हे कुशल नेता आणि यशस्वी मंत्री असल्याचं सांगितलं. जयशंकर यांनी सर्व सदस्यांच्या प्रश्नांना अतिशय योग्य अशी आणि सुष्पष्ट उत्तरं दिल्याचं राव यांनी सांगितलं. काँग्रेसचे नेते आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री शशी थरूर यांनीही बैठक चांगली झाल्याचं सांगितलं. बैठकीला परराष्ट्र सचिव वी.के.गोखले आणि हर्षवर्धन श्रृंगला यांच्यासह मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.