नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यत कर्जमाफी दिल्यानंतर, आता दोन लाखांवर कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा सर्वसमावेशक कर्जमाफी योजना लवकरच आणू, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूर इथल्या वाळवा तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. मदत देण्याच्या बाबतीत केंद्रसरकार दुजाभाव करत आहे, असा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला.
केंद्र सरकारकडे संपूर्ण देशाचं पालकत्व असतं याची जाणीव सरकारनं ठेवावी, असं ते म्हणाले महविकास आघाडीमुळे नवीन मजबूत सहकारी मिळाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.