नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे जनसंपर्क कार्यक्रमाअंतर्गत 14 केंद्रीयमंत्री दाखल, झाले असून या जनसंपर्क कार्यक्रमाच्या आजच्या सत्राचं उद्धाटन मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं. कौशल्यविकासामुळे काश्मिरी युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाअंतर्गत केंद्रीय रोजगार मंत्री संतोषकुमार गंगवार आज जम्मू-कश्मीरमधल्या रामबन जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चंदरकोट इथल्या ६ पूर्णांक ३ मेगावॅट क्षमतेच्या रोहित्राचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं. ग्रामीण विद्युतिकरणाच्या कार्यक्रमांतर्गत २ कोटी ५८ लाख रुपये खर्चून हे रोहित्र तयार केलं आहे.

या माध्यमातून किरेन रिजीजू, नितीन गडकरी, अनुराग ठाकूर असे मंत्रीही आज जम्मूतल्या सात जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असून, येत्या चार दिवसात रविशंकर प्रसाद, रमेश पोखरियाल काश्मीर भेटीवर जातील.

, झाले असून या जनसंपर्क कार्यक्रमाच्या आजच्या सत्राचं उद्धाटन मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं. कौशल्यविकासामुळे काश्मिरी युवकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.