नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तान्हाजी चित्रपटातल्या दृश्यांचा वापर करून दिल्लीतल्या निवडणुशी संबंधित तयार केलेल्या चित्रफितीचा भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

ते आज बातमीदारांशी बोलत होते. भाजपा या चित्रफितीचा निषेध करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, अशी भाजपाची भूमिका असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.