नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बल्गेरियात सुरु असलेल्या स्ट्रँडजा स्मृती मुष्टीयुद्ध स्पर्धेत शिव थापा आणि सोनिया लाठेर यांनी भारताची पदकं निश्चित केली आहेत. सोफिया इथं काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत ६३ किलो वजनी गटात शिवाथापानं आर्यलंडच्या जार्ज बेट्स याच्यावर मात करुन उपांत्यफेरी गाठली तर ५७ किलो वजनी गटात सोनिया लाठेर हिनं आर्यलंडच्याच मिशेला वॉल्श हिचा पराभव केला.

तर मोहम्मद हसमउद्दीन यानं ५७ किलो वजनी गटात आर्यलंडच्या कुर्त वॉकर याच्यावर मात केली. या तीनही मुष्ठियुद्धपटूंनी उपांत्यफेरी गाठल्यामुळे भारतीय क्रीडा रसिकांच्या आशा उंचावल्या आहेत.