टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात मीराबाई चानूने पटकावले रौप्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून भारताच्या ऑलिम्पिक पदक तालिकेत मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिक...
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सिनेटकडे पाठवण्याबाबत अमेरिकी प्रतिनिधीगृहात आज मतदान होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग प्रक्रिया सिनेटकडे पाठवण्याबाबत अमेरिकी प्रतिनिधीगृहात आज मतदान होणार आहे. ४३५ सदस्यांच्या या प्रतिनिधी गृहात डेमोक्रॅटिक पक्षाचं बहुमत आहे.
आपल्या राजकीय...
प्रधानमंत्री, केंद्रीय क्रीडा मंत्री, यांनी केलं जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या ओरेगन इथं चालू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. एका ट्विटमध्ये,...
२२ देशांकडूनकोरोना प्रतिबंधक लसींची भारताकडे मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरातल्या २२ देशांनी भारताकडे कोरोना प्रतिबंधक लसींची मागणी केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. भारतानं आतापर्यंत १५ देशांना लस पुरवठा केला आहे.
दोन फेब्रुवारीपर्यंत...
परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर हे कालपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर आहेत.
भारत-कतार उद्योग गोलमेज परिषदेनं त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. जयशंकर यांनी यावेळी इथल्या उद्योजकांना आत्मनिर्भर...
मालदीवचा सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरव होणार आहे. प्रसारभारतीने याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे. मोदी सध्या दोन दिवसीय मालदीव आणि श्रीलंकेच्या विशेष दौऱ्यासाठी रवाना झाले...
सौदी अरेबिया भारतात करणार शंभर अब्ज डॉलर्सची गुंतवणूक
नवी दिल्ली : भारताच्या संभाव्य विकास वाढीची दखल घेत जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार देश असलेल्या सौदी अरेबियानं गुंतवणुकीसाठी आता भारतावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. देशातील पायाभूत सुविधा...
अमेरिकी सिनेटकडून महाभियोगाच्या आरोपांमधून अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप दोषमुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर चालवलेल्या महाभियोगात सिनेटनं त्यांना सर्व आरोपांमधून दोषमुक्त केलं आहे. सत्तेचा गैरवापर आणि प्रतिनिधी गृहाची अडवणूक केल्याच्या आरोपावरुन लावलेल्या दोन कलमांमधून...
चीनमधे कोरोनामुळे मृत्यूमुखींची संख्या दोन हजारावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधे नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दोन हजारावर पोचली आहे. काल हुबेई प्रांतात आणखी १३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तिथं आणखी एक हजार...
अॅस्ट्रोसॅट अवकाश दुर्बिणीनं टिपली ५०० व्या कृष्णविवराची व्युत्पत्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात तयार करण्यात आलेल्या अॅस्ट्रोसॅट या अवकाश दुर्बिणीनं ५०० व्या कृष्णविवराची व्युत्पत्ती टिपली आहे. अॅस्ट्रोसॅटमध्ये अल्ट्राव्हायोलेट, ऑप्टिकल आणि क्ष-किरणांच्या माध्यमातून अवकाशातल्या घडामोडी टिपल्या जातात. यात...










