वस्तू व सेवा कर विभागाच्या विशेष मोहिमेअंतर्गत जीएसटी चुकवणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल

मुंबई : वस्तू व सेवा कर विभागाच्यावतीने विशेष मोहीम कारवाई अंतर्गत खोटी देयके सादर करणाऱ्या विविध सहा कंपन्यांच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे,...

पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन चोवीस तास खुलं असणार

मुंबई (वृत्तसंस्था) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर कालपासून भाविकांसाठी पंढरपूरमध्ये विठुरायाचं दर्शन चोवीस तास खुलं करण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनंतर होणाऱ्या प्रक्षाळ पूजेपर्यंत विठ्ठल रखुमाईचं दर्शन हे भाविकांसाठी २४ तास खुलं...

लोकप्रतिनिधींना राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक – मंत्री चंद्रकांतदादा पाटील

नागपूर : संसद, विधिमंडळात काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदारसंघातील प्रश्नांबरोबरच राज्याच्या प्रश्नांची जाण असणे आवश्यक आहे. जनहित तसेच विकासाची कामे करताना लोकप्रतिनिधींना कायदे, नियम याची इत्यंभूत माहिती असणे आवश्यक आहे,...

जनतेसाठी खुलं करण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला उदंड प्रतिसाद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षीच्या एप्रिल महिन्यात जनतेसाठी खुलं करण्यात आलेल्या प्रधानमंत्री संग्रहालयाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. उद्घाटन झाल्यापासून दोन महिन्यांत भारत आणि जगभरातून ५० हजारांहून अधिक पर्यटकांनी...

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. साहित्यरत्न, लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा...

पर्यावरणपूरक सवयी अंगिकारून पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने हातभार लावावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जागतिक ओझोन दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कार्यक्रम संपन्न मुंबई : सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये, यासाठी जगभर केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमध्ये भारत सहभागी आहे. या अनुषंगाने केंद्र...

भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन ब्रँडिंग करणे गरजेचे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत...

मुंबई : भरडधान्य हे अन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत असून खाद्यपदार्थ म्हणून त्याची निवड करणे काळाची गरज आहे. भरडधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देऊन त्याचे ब्रँडिंग करणे गरजेचे असून त्यासाठी ही आंतरराष्ट्रीय...

गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवा असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक मध्ये केली....

नारी शक्ती पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

मुंबई : सामाजिक क्षेत्रात ज्या महिला किंवा व्यक्तींनी मौलिक कार्य केले आहे, अशा महिला किंवा व्यक्ती यांच्या सन्मानार्थ केंद्र शासनामार्फत ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन “नारी शक्ती...

१ हजार एसटी गाड्यांचे सीएनजी रुपांतर करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) :कोरोना संकटामुळे घटलेली प्रवासी संख्या आणि इंधनाच्या वाढत्या किमतीमुळे आलेला आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एसटी महामंडळानं आपल्या ताफ्यातल्या १ हजार गाड्या सीएनजीमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे,...