अंदमान-निकोबार तसंच लक्षद्वीप बेटांचा विकास आणि उपयुक्त सुविधा देण्याचा केंद्र सरकारनं निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अंदमान-निकोबार द्वीपसमूहातली सोळा बेटं, तसंच लक्षद्वीप मधली दहा बेटं यांचा पर्यटनाच्या दृष्टीनं विकास आणि सागरी खाद्यांन्न तसंच नारळावर आधारित उत्पादनांच्या निर्यातीला उपयुक्त सुविधा देण्याचा निर्णय...
केरळच्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांच्या प्रवेश याचिकांवर तीन आठवड्यांनी सर्वोच्च न्यायालय करणार सुनावणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळातल्या सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातल्या महिलांना प्रवेश द्यायची मागणी करणा-या याचिकांवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं तीन आठवडयांसाठी स्थगित केली आहे.
सरन्यायाधीश एस.ए.बोबडे यांच्या अध्यक्षतेखालचं नऊ न्यायाधीशांचं घटनापीठ...
राज्यातील सर्वच धोकादायक प्रकारातील उद्योगांचे सेफ्टी ऑडिट करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तारापूर स्फोटाची संपूर्ण चौकशी
मुंबई : तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटाची गंभीर दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून आज त्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याशी चर्चा...
मुंबई, पुण्यासह महानगरपालिकांच्या शाळांचा दिल्लीच्या धर्तीवर विकास करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
ग्रामविकास विभागामार्फत शाळांसाठी २० टक्के निधी
मुंबई : मुंबई, पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड तसेच नवी मुंबईसारख्या महानगरांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी दिल्लीमधील सरकारी शाळांच्या धर्तीवर इथल्या महापालिकांच्या शाळांचा विकास...
‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकाविल्याबद्दल हर्षवर्धन सदगीर यांचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई : कुस्तीतील 'महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकाविल्याबद्दल कुस्तीपटू हर्षवर्धन सदगीर याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. हर्षवर्धनच्या पाठीवर शाबासकीची थाप ठोकून मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी त्याचे कौतुक केले.
कुस्तीपटु हर्षवर्धनने...
रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनांना गती देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसनाच्या अनेक योजना रखडलेल्या आहेत. काही प्रकल्पांचे बांधकाम बंद आहे. रहिवाशांना घरभाडे मिळत नाही. घरभाड्यात बाजारभावाप्रमाणे वाढ होत नाही. संक्रमण शिबीरे व्यवस्थित नाहीत, तर काही प्रकल्प...
हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेला जमीन देण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा...
वाहतूक नियमांचे पालन करुन सुरक्षित महाराष्ट्र घडवूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन
मुंबई : राज्यात वाहतुकीचे नियम पाळून सुरक्षित महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम स्वयंस्फूर्तीने पाळावेत. स्वत:चा आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात येणार नाही याची...
इराणमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामे द्यावेत या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी तेहरानमध्ये काढले निषेध मोर्चे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी राजीनामे द्यावेत, या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी तेहरानमध्ये निषेध मोर्चे काढले.
युक्रेनच्या विमानावर इराणी सैन्यानं चुकून मिसाईल हल्ला केला, अशी कबुली इराणच्या हवाई दलानं...
फिलिपीन्समध्ये ज्वालामुखीतुन मोठ्या प्रमाणात निघाली राख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्समध्ये एका ज्वालामुखीत मोठ्या प्रमाणात राख निघाली असून, प्रशासनानं आजूबाजूला राहणा-या सुमारे आठ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत.
राजधानी मनीलाच्या दक्षिणेकडे ताल ज्वालामुखीतून निघालेली...











