नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपीन्समध्ये एका ज्वालामुखीत मोठ्या प्रमाणात राख निघाली असून, प्रशासनानं आजूबाजूला राहणा-या सुमारे आठ हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत.

राजधानी मनीलाच्या दक्षिणेकडे ताल ज्वालामुखीतून निघालेली ही राख आकाशात एक किलोमीटरपर्यंत पसरली होती.

फिलिपीन्सच्या ज्वालामुखी आणि भूकंप मापन संस्थेनं आजूबाजूच्या रहिवाशांना सुनामीचा इशारा दिला आहे. तसंच विमानसेवाही खंडित करण्यात आली आहे.