रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जलपर्णी नष्ट करण्यासाठी राज्यात हर्बल फवारणी पद्धतीचा वापर करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य नदी संवर्धन योजनेत कामवरी नदीचा समावेश : मंत्री उदय सामंत
मुंबई : भिवंडी तालुक्यातील कामवरी नदीत जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण झाले आहे. उल्हास नदीवर हर्बल फवारणी केल्यामुळे जलपर्णी कायमस्वरूपी...
सफाईची कामे करणाऱ्या सर्व कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू; वारसा हक्कासाठी सुधारित तरतुदी
मुंबई : सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सर्व सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशी लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या कामगाराचे पद काहीही असले आणि त्याला सफाईशी संबंधित काम दिले...
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील बलिया येथील 6500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या...
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज उत्तर प्रदेशातील बलिया येथील चिटबाडा गावात 6500 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 7 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किसान सन्मान योजनेचा १६ हजार कोटी रुपयांच्या १३ व्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारमुळे सरकारी योजना या वेगाने कार्यान्वित होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बेळगावी इथं आयोजित कार्यक्रमात...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे ६ हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळात आज सुमारे ६ हजार ३८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत या मागण्या सादर केल्या. त्यानंतर महाराष्ट्र महापालिका आणि...
विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत विरोधकांची घोषणाबाजी
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही म्हटल्याचं सांगत विरोधकांनी आज विधानपरिषदेत हौद्यात उतरून निषेध करत घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य...
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आज राज्यभरात “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून होतोय साजरा
मुंबई (वृत्तसंस्था) : कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आज राज्यभरात “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्तानं आज अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानमंडळातील मराठी...
आगामी काळात भारतात बनलेल्या प्रवासी विमानाद्वारे देशातली लहान-मोठी शहरं जोडली जातील, असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात भारतात बनलेली प्रवासी विमानं आकाशात उड्डाण घेतील आणि देशाच्या लहान आणि मोठ्या शहरांना एकमेकांशी जोडतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे....
अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन आणि युवकांना रोजगार द्यायला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवन करणे आणि युवकांना रोजगार द्यायला राज्य सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केलं. मुंबईत विधानभवनात राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या...











