छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शपथविधीनंतर प्रथमच मंत्रालयात आगमन झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी केंद्रीय...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केल्यानंतर पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धनादेशावर केली व हा एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश दादर येथील श्रीमती...

काँगोमधल्या विमान दुर्घटनेत २९ जण ठार तर १९ जण जखमी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँगोमधल्या गोमा या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात काल एक प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत, सुमारे २९ जण ठार झाले. विमानातल्या एका प्रवाशासह जखमी झालेल्या इतर...

सरकारी कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्त करण्यासंबंधी प्रस्तावावर विचाराधीन नसल्याच केंद्र सरकारचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी कर्मचाऱ्यांना 60 व्या वर्षी किंवा 33 वर्षांचा सेवा काळ पूर्ण केल्यावर सेवा निवृत्त करण्यासंबंधी  कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही, असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे. लोकसभेत...

महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी केला गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज उद्या दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं आहे. आज सकाळी लोकसभेचं कामकाज...

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा राज्यापालांकडे दावा

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनं राज्यापालांकडे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठीचा दावा केला आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या तीनही पक्षांच्या विधीमंडळ गटनेत्यांच्या...

युवकांमधे जलसंवर्धनाची सवय रुजण्यासाठी राज्यपालांनी प्रयत्न करण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना युवक आणि विद्यार्थी समुदायांमधे जलसंवर्धनाच्या चांगल्या सवयींचा संदेश पोहचवण्याचं आवाहन केलं आहे. पुष्करम सारख्या पारंपरिक जल उत्सवाचा संदेश सर्वदूर पोहचवण्यासाठी...

भारतीय चित्रपटांविषयी उत्तर सुदानमध्ये मोठा आदर-ॲन्ड्रयू लुरी

गोवा : इफ्फीमध्ये ‘हार्टस ॲण्ड बोन्स’ हा ऑर्स्टेलियाचा चित्रपट प्रदर्शित झाला. युद्धाचे छायाचित्र करणारा छायाचित्रकार आणि दक्षिण सुदानी शरणार्थी यांच्यात फुलणारी मैत्रीची कथा बेन लॉरेन्स दिग्दर्शित या चित्रपटात साकारली आहे....

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्ती पटुंनी सहा सुवर्णपदकांची केली कमाई

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनी इथं सुरु असलेल्या १५ वर्षाखालील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कुस्ती पटुंनी सहा सुवर्ण पदकांची कमाई केली. स्पर्धेच्या पुरुष विभागात ४८ किलो वजनी गटात आकाशनं...

ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन कॉन्झर्वेटिव पक्षाचा जाहीरनामा करणार प्रसिद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन त्यांच्या कॉन्झर्वेटिव पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहेत. ब्रिटनमधे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत विजय मिळवण्याच्या दृष्टीनं या जाहीरनाम्यात ब्रेक्झीट आणि कठोर उपाय योजनांसदर्भात...