नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी २६ युरोपीय देशांमधे प्रवास करण्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बंधनं आणली आहेत. त्यामुळे ब्रिटन वगळता इतर युरोपीय देशातल्या नागरिकांना अमेरिकेला जाता येणार नाही.

तसेच युरोपातून येणाऱ्या कुठल्याही सामानालाही अमेरिकेत प्रवेश नसेल. नवे नियम उद्यापासून अंमलात येणार आहेत. अमेरिकी जनतेला कोरोनापासून वाचवण्यासाठी हे कठोर पाऊल आपल्याला उचलावं लागत असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

युरोपियन युनियन कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी फारसे प्रयत्न करत नसल्यामुळे अमेरिकेला पाऊल उचलावं लागत असल्याचे ट्रम्प म्हणाले.