नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१९ वर उपाय ठरू शकणाऱ्या दोन लसींची माणसावर चाचणी घेण्याची तयारी पूर्ण झाल्याचं ऑस्ट्रेलियातल्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

CSIRO अर्थात राष्ट्रकुल शास्त्रीय आणि औद्योगिक संशोधन संस्था, जानेवारी महिन्यापासून ही लस शोधण्याचं काम करत असून लसीची चाचणी करून घेण्यासाठी उमेदवारांची प्रतीक्षा असल्याचं या लसीवर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

ही लस जास्तीत जास्त प्रभावी ठरावी यासाठी पुढच्या चाचण्या  सुरु असून येत्या  तीन महिन्यात त्याचा निकाल अपेक्षित असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.