मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे डॉ.आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपली आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी दीपप्रज्वलन करून महामानवाला अभिवादन केले.

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार, विशेष सचिव राकेश नैथानी, उपसचिव श्वेता सिंघल, परिवार प्रबंधक बादल कुमार, खाजगी सचिव उल्हास मुणगेकर यांचेसह राजभवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.