नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँकांची आर्थिक फसवणूक करून फरार झालेला मद्य उद्योजक विजय माल्या याची प्रत्यार्पणाविरोधातली याचिका ब्रिटनच्या न्यायालयानं फेटाळून लावली आहे. यामुळे माल्या याला भारतात परत आणण्याचा भारताचा मार्ग काहीसा सोपा झाला आहे.

या निर्णयाविरोधात ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करता यावी, यासाठीच्या परवानगीसाठी माल्या याला १४ दिवसांत अर्ज करावा लागेल. मात्र त्यानं अपील केलं नाही तर भारत आणि ब्रिटनमधल्या करारानुसार माल्या याचं भारताला प्रत्यार्पण केलं जाऊ शकतं.