????????????????????????????????????

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून (पीएमआरडीए) या परिसराच्या शाश्‍वत विकासाचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत नागरी सुविधा देण्यावर भर दिला आहे. ‘रिंगरोड’, ‘मेट्रो’, ‘टीपी स्कीम’ या प्रकल्पांमुळे महानगर क्षेत्राच्या विकासाचा वेग वाढणार असल्याचे मत महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  व्यक्त केले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आकुर्डी येथील प्राधिकरणाच्या कार्यालयात झाली. यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, राज्यस्तरीय लेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, आ. महेश लांडगे, आ. लक्ष्मण जगताप, आ.बाबुराव पाचरणे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त  विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, पुणे मेट्रोसोबतच, वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’ने ‘रिंगरोड’चे काम हाती घेतले आहे. मुंबई आणि पुणे महानगर यामधील प्रवासासाठी लागणारा वेळ ‘पीएमआरडीए ‘हायपर लूप’ या आधुनिक वाहतूक व्यवस्थेमुळे कमी  होणार आहे, या प्रकल्पांची कामे विहित कालावपधीत पुर्ण करणे आवश्यक असल्याचे  त्यांनी सांगितले. यावेळी पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेली विविध विकासकामे व प्रकल्पाबाबत पीएमआरडीएचे महानगर आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली.