सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात ७०० नव्या एस.टी.बसेस समावेश होईल, अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नुकतीच केली. या सर्व बसेस आर.टी.ओ. पासिंग सोलापुरात होणार आहे. यामुळे आता राज्यभर सोलापुरात पासिंग झालेल्या म्हणजेच एच.एच. १३ च्या गाड्या धावताना दिसणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच सोलापुरात एस.टी.च्या ७०० गाड्यांचे पासिंग येत्या काळात सोलापुरात होणार आहे.
या सर्व बसेसची बांधणी जहिराबाद येथे होणार असून येथून सोलापूरचे अंतर जवळ असल्याने या गाड्यांचे पासिंग सोलापुरात करण्यात येणार आहे. सोलापुरात पहिल्यांदाच एकदम ७00 गाड्यांचे पासिंग होणार आहे. यामुळे आता राज्यभर सोलापूर पासिंगच्या गाड्या धावणार आहेत. या सर्व गाड्या अत्याधुनिक अशा एम.एस. बॉडीच्या असणार आहेत. सर्व जाहीर केलेल्या बसेसची बांधणी ही जहिराबाद येथे होणार आहे. यामुळे या सर्व गाड्यांचे पासिंग सोलापुरात होणार आहे.